नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, गावच्या आजीच्या हातचा चुलीवरचा कोंबड्याचा रस्सा अगदी गावरान स्टाईलमध्ये. ज्याने तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. कोकणात अजूनपण जुनी जाणती लोकं आहेत ती आपल्या मायेपोटी आपल्या मुंबईकरी, चाकरमान्यांसाठी गावी कोंबडी राखून ठेवत असतात. जेव्हा बाबू मुंबईवरून येईल, नातोंडाना सोन्याचा घास होईल म्हणून आपली गावची प्रेमळ लोकं (आजी-आजोबा) कोंबडी राखून ठेवतात आणि गावी आल्यावर त्यांची मनापासून सेवा करतात. खरं तर त्यांची सेवा करायचं काम आपलं असतं परंतु तेच आपली सेवा करायला लागतात एवढी प्रेमळ लोकं गावी आपल्या कोकणात आहेत. आम्ही सुद्धा सुट्टीमध्ये गावी कोकणात गेलो होतो तर त्यावेळेस आजीच्या हातच्या गावठी कोंबड्याच्या चुलीवरच्या रस्स्याला चाखायचा मान आम्हाला मिळाला, आणि त्या गोड आठवणी मी कॅमेराबद्द केल्या आणि खास तुमच्यासाठी घेऊन आलो.
#ajichyahatcha #kombadirassa #chickenrecipe #sforsatish
तुम्हाला व्हिडीओ आवडल्यास Like, share करायला विसरू नका.
येवा कोकण आपलाच असा!
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
source